Bhosari crime News : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. यामध्ये अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनू शिवाजी साळुंके (वय 19, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार जानेवारी 2020 ते 23 फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला. आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलीला ‘तू मला आवडतेस’ असे म्हणून तिला दिघी डोंगरावर नेले.

तिच्यासोबत कारमध्ये लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर दिघी येथील मॅगझीन चौकात एका लॉजवर नेऊन तिच्यासोबत वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले.

पीडित मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत बलात्कारासह पॉक्सो (बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.