Bhosari Crime News : जेवण वाढणार नाही म्हणत पत्नीने पतीच्या हाताचे हाड मोडले

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीस जेवण वाढायला सांगितले, पत्नीने जेवण वाढण्यास नकार दिला. या वरून झालेल्या वादात पत्नीने पतीच्या हातावर लोखंडी सळी मारून हाताचे हाड मोडले. ही घटना गुरूवारी (दि.17) शिवशंकर कॉलनी, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी प्रकाश महारूद्राप्पा मठपती (वय 61, रा. शिवशंकर कॉलनी, भोसरी) यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सत्यशिला प्रकाश मठपती (वय 34, रा. शिवशंकर कॉलनी, भोसरी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश हे गुरूवारी (दि.17) रात्री दहा वाजता बाहेरून फेरफटका मारून घरी आले. घरी आल्यावर पत्नी सत्यशिला हिला त्यांनी जेवण वाढण्यास सांगितले. पत्नीने जेवण वाढण्यास नकार देत शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.

त्यानंतर तिने हातात लोखंडी सळी घेऊन पतीच्या उजव्या हातावर मारली. त्यात त्यांच्या हाताचे हाड मोडले.

या प्रकरणी पती प्रकाश यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरिक्षक काळे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.