Bhosari Crime News : पूर्ववैमनस्यातून दोघांना मारहाण; एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून चार जाणांनी मिळून दोघांना मारहाण करत जखमी केले. ही घटना 27 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास भोसरी येथील सद्गुरूनगर येथे घडली.

कपील लिंबाजी मुटकुळे (वय 21, रा, आळंदी) यांनी प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सोनु (वय 22), गोविंदा (वय 19). तिऱ्या (वय 21) आणि विज्या (वय 20, सर्व रा. सद्गुरुनगर, भोसरी ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लघुशंका करण्यासाठी थांबलेले असताना आरोपींनी संगनमत करून जुन्या भांडणाच्या रागातून फिर्यादी आणि त्यांचा मित्र नितिन हांडे याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानतंर आरोपी तिऱ्या याने रस्त्यावर पडलेला दगड नितिन हांडे यास फेकून मारला. त्यात हांडे यांच्या डोक्याला व डोळ्यास गंभीर इजा झाली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.