Pune News : तीन टप्प्यात ऊसाची एफआरपी देण्याच्या शिफारशींविरोधात भाजप किसान मोर्चाचे आंदोलन

एमपीसी न्यूज – सद्यस्थितीत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकरी ‘न भूतो’ अशा आर्थिक संकटातून जात आहे. शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने उसाची एफआरपी अजूनही दिली नाही त्यामुळे भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाने महाविकास आघाडी सरकारच्या शेतकऱ्यांच्या या ऊसाच्या एफआरपी देण्याच्या शिफारशी विरोधात पुण्यात साखर आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन कले.

या आंदोलनाच्या वेळी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना उसाची एफआरपी अजूनही दिली नसल्यामुळे सरकारचा निषेध यावेळी व्यक्त करण्यात आला.
हे आंदोलन भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव नाना काळे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले.

या आंदोलनाला भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाचे सरचिटणीस मंकरड कोरडे, माजी आमदार बाळासाहेब मुरकटे, संजय थोरात, केशव कामठे, माऊली शेळके, संजय पाटील व शेतकरी उपस्थित होते.

वासुदेव नाना काळे म्हणाले, शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने उसाची एफआरपी लवकरात लवकर दिली पाहिजे. राज्य सरकारने 2-3 वर्षे शेतकऱ्याकडे लक्ष दिले नाही. राज्य सरकारमधले मंत्री शेतकऱ्यांकडे उसाच्या एफ आर पी बाबत केंद्र सरकारकडे शिफारस केली आहे असे सांगतात. राज्यातील शेतकरी हा फक्त शेती करतो.

शेतकऱ्याना शेती मधून जे उपत्न येते त्यावर शेतकरी जगतो. जर राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना उसाची एफआरपी 1 टक्क्याप्रमाणे जर दिली नाही तर देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल, असा इशारा वासुदेव काळे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.