Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीसह पंचक्रोशीत कार्यक्रमांचा ‘धुमधडाका’

सांस्कृतिक, धार्मिक अन्‌ सामाजिक उपक्रमांची पर्वणी

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांच्या (Bhosari) वाढदिवसानिमित्त तब्बल 100 हून अधिक सामाजिक उपक्रम अन्‌ सांस्कृतिक कार्यक्रमांचा ‘धुमधडाका’ होणार आहे. विशेष म्हणजे, पंचक्रोशीतील गावनिहाय आयोजन केल्याचे दिसते. त्यामुळे लांडगे समर्थक व हितचिंतकांनी यंदाचा वाढदिवस ‘ग्रँड सेलिब्रेट’ करण्याचा संकल्प केल्याचे चित्र आहे.

कोणताही कार्यक्रम किंवा सामाजिक उपक्रम भव्य-दिव्य साजरा करणारा लोकप्रतिनिधी अशी आमदार महेश लांडगे यांची महाराष्ट्राभरात ओळख आहे.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी इंद्रायणी थडी जत्रा, भारतातील सर्वांत (Bhosari) मोठी बैलगाडा शर्यत आणि इंडिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या दिशेने वाटचाल करणारी ‘रिव्हर सायक्लोथॉन-2023’ असा गर्दीचा उच्चांक गाठणाऱ्या उपक्रमांमुळे आमदार लांडगे महाराष्ट्रभरात चर्चेत असतात.

लांडगे समर्थक आणि मित्र परिवाराच्या माध्यमातून प्रतिवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त 27 नोव्हेंबर रोजी अभिष्ठचिंतन सोहळा होतो. 2021 मध्ये 1 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरपर्यंत असे महिनाभर विविध कार्यक्रमांचे नियोजन केले होते.

गतवर्षी आमदार लांडगे यांना मातृशोक झाला. त्यामुळे समर्थकांनी त्यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला होता. तत्पूर्वी, कोविड महामारी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरपरिस्थिती आणि कोकणातील निसर्ग चक्रीवादळाच्या संकटामुळे वाढदिवस साजरा करता आला नाही.

आता यावर्षी वाढदिवस थाटात साजरा करण्याचा संकल्प आमदार लांडगे समर्थक आणि त्यांच्याशी संबंधित विविध संस्था, संघटनांनी केला आहे.

PCMC : महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनो भेटवस्तू स्वीकारू नका, अन्यथा…

सामाजिक बांधिलकी आणि नेत्याप्रति आदरभाव…

सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक यासह आरोग्य (Bhosari) विषयक उपक्रमांची महिनाभर रेलचेल राहणार आहे. यावर्षी दिवाळीनंतर 18 नोव्हेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत 20 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे नियोजन केले आहे.

महाराष्ट्रातील प्रसिद्ध कलावंतांना यानिमित्ताने निमंत्रित केले आहे. महान भारतकेसरी, महाराष्ट्र केसरी अशा बैलागाडा शर्यती चाकण- राजगुरूनगर परिसरात होणार आहेत.

यासोबतच महाराष्ट्रातील सर्वांत मोठे अश्व व देशी गोवंश पशू प्रदर्शनही मोशीत होणार आहे. पर्यावरण व इंद्रायणी नदी संवर्धनाचा संदेश देण्यासाठी ‘वर्ल्ड रेकॉर्ड’कडे वाटचाल करणारी ‘रिव्हर सायक्लोथॉन-2023’, जॉय स्ट्रिट- 2023, सोसायटीधारकांसाठी क्रिकेट स्पर्धा, महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा, मोफत बाल जत्रा, भीमाशंकर-ओझर-लेण्याद्री देवदर्शन, मुलांसाठी विविध स्पर्धा, हास्यजत्रा अशा विविध कार्यक्रम निगडी, तळवडे, चिखली, जाधववाडी, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली, दिघी, भोसरी, नेहरुनगर या सोबतच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विविध कार्यक्रम होणार आहेत.

सामाजिक बांधिलकी आणि नेत्याप्रति असलेला आदरभाव यामुळेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढदिवसाचे ‘सेलिब्रेशन’ होते आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.