Bhosari : आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेसाठी रणशिंग फुंकले

हायटेक वॉर रुमचे माधव भंडारीच्या हस्ते उदघाटन

एमपीसी न्यूज – आमदार महेश लांडगे यांचे संघटन कौशल्य मोठ्या प्रमाणावर आहे. संघटन कौशल्य आणि वैयक्तिक प्रभाव यांमुळे लोकाभिमुख समस्या सोडविण्यासाठी आमदार महेश लांडगे यशस्वी होतील, असा विश्वास भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केला.

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी अक्षय तृतीयाचा मुहूर्त साधत विधानसभेसाठी रणशिंग फुंकले आहे. अक्षय तृतीयेनिमित्त लांडगे यांच्या वॉर रुमचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माधव भंडारी बोलत होते. यावेळी महापौर राहूल जाधव, स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी, माजी महापौर नितीन काळजे आदी आजी माजी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

  • यावेळी माधव भंडारी पुढे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांच्या पाठीमागे युवा कार्यकर्त्यांची फौज मोठ्या प्रमाणावर आहे. भोसरीमध्ये अकरा वॉर्डमध्ये ४४ पैकी ३३ नगरसेवक भाजपचे आहेत. वेगवेगळ्या सामाजिक, राजकीय लोकाभिमुख उपक्रमांतून गेल्या चार वर्षात आमदार महेश लांडगे यांनी जनसंपर्क मजबूत केला आहे. या सर्वांचा परिपाक म्हणजे आज होऊ घातलेल्या वॉर रुमचे उदघाटन होय.

विधानसभा निवडणुकीत लोकसभेप्रमाणे महायुती झालीच तर भोसरीची जागा शिवसेनेला जाण्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीचा शब्द दिल्यानंतर लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे सक्रीय झाले .

  • आमदार महेश लांडगे यांनी भोसरी विधानसभेवर आपली पक्कड मजबूत करुन घेतली आहे. एक प्रकारे आजच्या वाॉरुरमचे उदघाटन म्हणजे विधानसभेची तयारी सुरु झाली आहे. विधानसभेचा आखाडा मारण्यासाठी भोसरीचा मल्ल तयार झाला आहे, असे संकेत या वॉर रुमच्या उदघाटनाच्या निमित्ताने आमदार महेश लांडगेंनी दिले.

त्यानंतर आमदार महेश लांडगे म्हणाले, आगामी विधानसभेची निवडणूक अद्ययावत पध्दतीने लढवावी, यांवर भर देण्यात येणार आहे. गेल्या चार वर्षात जनतेच्या साथीने महत्वपूर्ण कामे केली. याही पुढे करीत राहीन. वेळोवेळी सर्वसामान्य जनतेच्या सुखदु:खामध्ये साथ दिली असल्याने ती जनता मला साथ देणार आहे. मागील वेळी जनतेने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मागील चार वर्षात भोसरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. ही विकासकामांची गंगा यापुढील काळातही कायम प्रवाहीत राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.