Dighi : लॅचलॉक तोडून चोरट्यांचा सोने-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज – घराचे लॅचलॉक तोडून कडी-कोयंडा उचकटून घरातील सुमारे 44 हजार पाचशे रुपये किमतीचे सोने -चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास दत्तनगर दिघी येथे उघडकीस आली.

शुभांगी प्रवीण ताटपुजे (वय 32, रा. तनिष्क आयकॉन, दत्तनगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभांगी 27 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी घराचे लॅचलॉक तोडून कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 44 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शुभांगी सोमवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी आल्या असता त्यांना हा प्रकार उघडकीस आला. याबाबत त्यांनी तात्काळ दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिघी पोलीस याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.