Dighi : दुचाकीस्वारांनी महिलेचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज – रस्त्याने जात असताना पतीला फोन करण्यासाठी खिशातून फोन काढला असता अनोळखी दोन दुचाकीस्वारांनी महिलेच्या हातून जबरदस्तीने फोन हिसकावून नेला. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी रोडवरील टाटा कम्युनिकेशन कंपनीजवळ घडली.

सोनामती राजेश प्रजापति (वय 34, रा. दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनामती रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास आळंदी रोडवरील टाटा कम्युनिकेशन कंपनीजवळ रस्त्याने जात होत्या. त्यांनी त्यांच्या पतीला फोन करण्यासाठी खिशातून फोन काढला. त्यावेळी अचानक दुचाकीवरून दोघेजण आले. त्यांनी सोनामती यांच्या हातातून जबरदस्तीने हिसका मारून मोबाईल फोन हिसकावला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.