Bhosari : विनयभंग आणि धमकावल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – मैत्रिणीसोबत चाललेल्या तरुणीचा दोघांनी विनयभंग केला. याबाबत तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणीला तिसऱ्याने फोन करून मारण्याची धमकी दिली. ही घटना एमआयडीसी भोसरी येथे गुरुवारी (दि. 31) दुपारी बाराच्या सुमारास घडली.

वैजनाथ खंडेराव रबदडे (वय 23, रा. इंद्रायणी नगर, भोसरी), संतोष प्रभू कोरडे (वय 24, रा. हनुमाननगर, भगतवस्ती, भोसरी) आणि आरिफ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास फिर्यादी तरुणी या एमआयडीसी भोसरी येथील ग्लोबल टूल्स कंपनी समोरुन मैत्रिणीसोबत पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी कोरडे आणि रबदडे यांनी फिर्यादी तरुणीचा विनयभंग केला.

याबाबत तक्रार करण्यासाठी तरुणी पोलीस ठाण्यात गेली असता आरोपी आरिफ याने तिला फोन करून ‘तक्रार केल्यास खूप मारीन’, अशी धमकी दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजू ठुबल तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.