Chikhali : धक्‍का लागल्याच्या कारणावरून तरुणावर वार

एमपीसी न्यूज – धक्‍का लागल्याच्या कारणावरून एकाने तरुणाला मारहाण करीत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार (दि. 29) रोजी चिखली येथे घडली.

याप्रकरणी मंगलराम वासुदेव वर्मा (वय 45, रा. नंदनवन हौसिंग सोसायटी, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तरुण गुंडे (रा. चिखली. पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गुंडे हा फिर्यादी वर्मा यांच्या तोंडओळखीचा आहे. मंगळवारी (दि. 29) फिर्यादी यांचा मुलगा अंकित याचा धक्‍का लागल्याच्या कारणावरून आरोपीने त्यास शिवीगाळ करीत लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

तसेच धारदार शस्त्राने अंकितवर वार केले. यामध्ये मंगलराम गंभीर जखमी झाले. चिखली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.