Hinjawadi : माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करणा-या सासरच्या चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेरहून 25 लाख रुपये आणण्याची मागणी करत विवाहितेच्या छळ करण्यात आला. याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 फेब्रुवारी 2018 ते 10 जुलै 2018 या कालावधीत उंब्रज बावधन म्हाळुंगे येथे घडला.

याप्रकरणी विवाहितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती रवींद्र धनाजी जाधव (वय 30), सासरे धनाजी नागोजीराव जाधव (वय 60), सासू जयश्री जाधव (वय 55, तिघेही रा. मु. पो. उंब्रज, ता. कराड, जि. सातारा) आणि नणंद माधवी भास्करराव पाटील (वय 33, रा. गजानन हाऊसिंग सोसायटी, कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी 2018 ते 10 जुलै 2018 या कालावधीत आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता यांनी माहेराहून 25 लाख रुपये आणावेत, अशी मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिल्याने तिचा वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ केला. तसेच हाताने आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक इरले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.