Dehuroad : लग्नातील मानपानावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – लग्नात मानपान न केल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गांधीनगर देहूरोड येथे घडली.

नासिर शेख, अमीना शेख, नौशाद नजिर शेख, यसमिन अमीन शेख, अमीन शेख (सर्व रा. गांधीनगर, देहूरोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 21 वर्षीय विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 मार्च 2019 ते 27 डिसेंबर 2019 या कालावधी घडली. फिर्यादी महिलेच्या लग्नात माहेरच्या लोकांनी सासरच्या मंडळींचा योग्य मानपान केला नाही. तसेच हुंडा म्हणून अंगठी व चेन दिली नाही. या कारणावरून आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला असल्याचे विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.