Bhosari News : शिवसेनेचे माजी शहरप्रमुख बाजीराव लांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख (Bhosari News ) बाजीराव धोंडीबा लांडे  यांचे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांचे वय 61 होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे. राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका डॉ. श्रद्धा लांडगे यांचे ते वडील तर, भाजपचे माजी नगरसेवक रवी लांडगे यांचे सासरे होत.

Pimpri : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे प्रज्ञासूर्य लोकनायक – महेश लांडगे

शहरातील निष्ठावंत शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. त्यांनी पूर्वीच्या हवेली विधानसभा मतदारसंघातून दोनवेळा निवडणूक लढवली होती. तत्कालीन पीसीएमटीचे सदस्य, हवेली तालुका प्रमुख तसेच महाराष्ट्र श्रमिक सेनेचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले.

खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने  (Bhosari News )त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर भोसरी येथील स्मशानभूमीत सायंकाळी पाच वाजता  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.