Bhosari News: दुकानातील कामगाराने पळवल्या हजारो रुपयांच्या मशीन

एमपीसी न्यूज – दुकानात काम करणा-या कामगाराने दुकानातील हजारो रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या. ही घटना बुधवारी (दि. 5) सकाळी एमआयडीसी भोसरी मधील श्री इंटरप्रायजेस या कंपनीत घडली.

पारस शर्मा (वय 40, रा. चोटीया, प्यासी, सलेमपूर, जि. देवोरीय, उत्तरप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी श्रीमंत ज्ञानदेव बोबडे (वय 36, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे एमआयडीसी भोसरी येथे श्री इंटरप्रायजेस नावाचे दुकान आहे. त्यांच्या दुकानात पारस शर्मा काम करत होता. त्याने बुधवारी सकाळी पावणे सात वाजता फिर्यादी यांच्या दुकानातून प्लास्टिक वेल्डिंग मशीन, प्लॅनर मशीन, जेक्सो मशीन, प्लास्टिक वेल्डिंग गन, 1600 वॅट पॉवरची प्लास्टिक वेल्डिंग मशीन असा एकूण 49 हजार 600 रुपये किमतीच्या मशीन चोरून नेल्या. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.