Pune News: जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्यायचं असेल तर ‘हे’ नियम पाळावेच लागतील

एमपीसी न्यूज: पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन रुग्ण सापडत आहेत.. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून पुन्हा एकदा नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी पुन्हा एकदा नियम आखून देण्यात आले आहेत.. त्यामुळे खंडेरायाच्या भक्तांना दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना या नियमाचे कठोरपणे पालन करावाच लागणार आहे.. काय नियम आहेत..पाहुयात…

कुलदैवत खंडेरायाच्या गडावर दर्शन घेण्यासाठी आता कोविड लस घेतलेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे.

  • लसीकरणाचे किमान १ किंवा २ डोस पूर्ण केलेल्या भाविकांना खंडेरायाच्या मंदिरात प्रवेश देण्यात येणार आहे.
  • ज्या भाविकांना खंडेरायाचे दर्शन घ्यायचे आहे त्यांना लसीकरणाचे तपशील प्रवेशद्वारावर उपस्थित कर्मचारी वर्गाला सादर करणे अथवा दाखविणे बंधनकारक आहे.
  • वय वर्ष १० पेक्षा कमी तसेच वय वर्ष ६५ पेक्षा अधिक वयाच्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला आहे.
  • मंदिरात मास्क शिवाय प्रवेश नसेल.
  • तसेच सोशल डिस्टन्सींग राखणे सहकोविड नियमावंलीचे पालन बंधनकारक करण्यात आले असल्याची माहिती श्री मार्तंड देवसंस्थांच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.