Bhosari News: इंद्रायणीनगरमधील उद्यान, बहूउद्देशीय हॉलच्या कामाचे महापौरांच्या हस्ते भूमिपूजन

एमपीसी न्यूज – धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाने उद्यानांसारख्या नैसर्गिक सानिध्यात वेळ घालवल्यास ताणतणाव दूर होण्याबरोबरच उत्तम आरोग्यही राखले जाईल असे प्रतिपादन महापौर उषा  ढोरे यांनी केले.   

महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ८ येथील सेक्टर क्रमांक १ मध्ये वैष्णोदेवी शाळेसमोर असलेल्या भूखंड ३ मध्ये अद्यावत उद्यान, बहूउद्देशीय हॉल आणि इतर अनुषंगिक कामाचा भूमिपूजन महापौर ढोरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला.  त्यावेळी त्या बोलत होत्या.

भोसरीतील इंद्रायणीनगरमध्ये झालेल्या या कार्यक्रमास क प्रभाग अध्यक्ष राजेंद्र लांडगे, नगरसदस्या सीमा सावळे, नम्रता लोंढे, नगरसदस्य विलास मडिगेरी, संजय वाबळे, सह शहर अभियंता सतीश इंगळे, क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, शशिकांत मोरे, सहाय्यक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

महापालिकेने लोकोपयोगी कामे करण्याकडे भर दिला आहे.  जनतेच्या गरजा विचारात घेऊन कामांचा प्राधान्यक्रम निश्चित केला जात असून अधिकाधिक कामे गतीने पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.  पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामे महापालिकेच्या वतीने नियोजनबध्द पध्दतीने राबविले जात असून नागरी सहभाग आणि सहकार्यामुळे विकासाच्या गतीला अधिक चालना मिळत आहे असे देखील  महापौर ढोरे म्हणाल्या.

प्रभाग क्रमांक ८ येथील सेक्टर क्रमांक १ मध्ये वैष्णोदेवी शाळेसमोर असलेल्या भूखंड ३ मध्ये सुमारे ७ कोटी ८१ लाख रुपये खर्च करुन अद्यावत उद्यान, बहूउद्देशीय हॉल आणि इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहे.  ९ हजार ९८३ चौरस मीटर जागेत ही कामे केली जाणार आहेत.  यामध्ये दुमजली बहुउद्देशीय हॉल, जॉगींग ट्रॅक, अॅम्पिथिएटर, पाथवे, फुटपाथ आणि चिल्ड्रेन प्ले एरिया विकसित करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.