Pune News : पुण्यात ‘या’ दिवशी पाणीपुरवठा राहणार बंद

एमपीसी न्यूज – पुण्यातील काही भागांमध्ये गुरूवारी (दि. 03 फेब्रु.) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.04 फेब्रु) सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पर्वती जलकेंद्राच्या अखत्यारीतील पर्वती एलएलआर टाकीची मुख्य पाण्याची लाईन व नव्याने टाकण्यात आलेल्या लाईनला जोडणीसाठीच्या कामामुळे तसेच नविन होळकर व चिखली पम्पिंग भाग, भामा आसखेड जलकेंद्र परिसर येथील विद्युत, पंम्पिंग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरूस्तीचे काम असल्याने पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

पाणी पुरवठा बाधीत होणारा भाग – 

  • पर्वती जलकेंद्र परिसर – शहरातील सर्व पेठा, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ
  • सहकार नगर – सहकार नं 2 मधील सर्व भाग, शाहू वसाहत, लक्ष्मी नगर मनपा शाळा क्र. 111 चा भाग
  • लष्कर जलकेंद्र परिसर – बेकर हिल जुन्या टाकीवर अवलंबून असणारा कौसर भाग परिसर, एमआयबीएम रोड, उंड्री रोड, साळूंके विहार रोड, उजवीबाजू, लोणकर गार्डन परिसर, वानवडी परिसर काही भाग, कोंढवा गावठाण, भाग्योेदय नगर, मिठानगर, शिवनेरी नगर, गल्ली क्र. 1, स.न. 354, ब्रह्मा इस्टेट, कृष्णा केवल, फकरी हिल, कुबेरा पार्क, ब्रह्मा एव्हेन्यू, शिवगंगा काॅम्लेक्स, निवृत्ती इनक्लेव्ह, माउंटकार्मल स्कूल, सहाणी सुजाणा पार्क, लुल्ला नगर संपुर्ण परिसर, वानवडी, साळूंके विहार दोन्ही बाजू, केदार नगर, आझाद नगर, शांती नगर, शिवरकर रोड दोन्ही बाजू, विकास नगर, जगताप नगर, शिंदे छत्री, SRP गट क्र 2 चा भाग, तात्या टोपे सोसायटी परिसर, शिवानंद, दयानंद सोसायटी, जगताप चौक, जांभूळकर चौक परिसर, संविधान चौक परिसर, रहेजा गार्डन, गंगा सॅटेलाईट परिसर
  • नवीन होळकर, चिखली पम्पिंग भाग – विद्यानगर, तिन्ग्रेनगर, कळस, धानोरी, लोहगाव, मुला रोड
  • भामा आसखेड जलकेंद्र परिसर – लोहगाव, विमाननगर वडगाव शेरी, कल्याणी नगर, विश्रांतवाडी, फुलेनगर, येरवडा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.