Bhosari News : दिघी मॅक्झिन चौक येथे वृक्षारोपण

एमपीसीन्यूज : श्री.विनायकराव भोंगाळे कृषी जल व पर्यावरण संवर्धन फाउंडेशन आणि गायत्री सखी मंच यांच्या विद्यमाने दिघी मॅक्झिन चौक येथे नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले.

भोसरीचे आमदार महेश लांडगे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, उन्नति सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

वसुंधरे प्रति आपली असणारी बांधिलकी आपण जपणे गरजेचे आहे. त्यासाठी मॅक्झिन चौक येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रमी पार पाडण्यात आला. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश कोषाध्यक्ष शैला मोळक, पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा उज्वला गावडे, कविता भोंगाळे, निकिता गोसावी, ले.कर्नल सतीश कुमार शर्मा, कविता कडू पाटील आदींनी वृक्षारोपणात सहभाग नोंदवला.

यावेळी विविध प्रकारच्या असंख्य वृक्षांचे रोपण करण्यात करण्यात आले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.