Bhosari News : कंपनीतील सुरक्षा रक्षकाने पळवले दीड लाखांचे साहित्य

एमपीसी न्यूज – कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणा-या एकाने कंपनीतून एक लाख 57 हजार 80 रुपयाचे वॉल्स चोरून नेले. ही घटना 18 ते 23 मे या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथील पीएचबीबी वॉल्स प्रा ली या कंपनीत घडली.

योगेश खंडेराव साळुंके (वय 26, रा. बो-हाडेवस्ती मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल अगरवाल (वय 41, रा.पिंपरी ) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी योगेश हा फिर्यादी यांच्या पीएचबीबी वॉल्स या कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. त्याने कंपनीतून एक लाख 57 हजार 80 रुपयांचे वॉल्स चोरून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.