Bhosari news: भोसरीतील ‘या’ भागातील पाणीपुरवठा गुरुवारी, शुक्रवारी विस्कळीत राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवार (दि.15) आणि शुक्रवार (दि.16) भोसरीतील काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत मुख्य जलवाहिनीच्या देखभाल दुरूस्तीची कामे हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गुरूवार (दि.15) पालिकेमार्फत होणा-या सकाळ नंतरच्या पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्यानंतर दुरूस्तीच्या कामामुळे ‘क’ व ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत WD4 (भाग :मोशी, डुडुळगाव ,च-होली, वडमुखवाडी इ.) इंद्रायणीनगर, भोसरी, संत तुकारामनगर दिघी मॅगझीन या टाक्यांवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील.

दुरूस्तीच्या कामासाठी सर्व पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवल्यामुळे या टाक्यांवरून होणा-या भागात दुस-या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. 16) होणारा पाणीपुरवठा अनियमित कमी दाबाने होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.