Bhosari News : ‘रिपाइं’च्या मुस्लिम कार्यकर्त्यांकडून शिवरायांना अभिवादन

एमपीसीन्यूज : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अल्पसंख्यांक आघाडीच्यावतीने ( आठवले) शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

अल्पसंख्यांक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष खाजाभाई शेख यांच्या भोसरी लांडेवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित कार्यक्रमात खाजाभाईंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी हाफिज जावेद सलगर, दावल नदाफ, अल्पसंख्यांक आघाडीचे शहराध्यक्ष शेखलाल नदाफ, बाबा पटेल,शफ़ीक़ शेख, गुड्डू नदाफ, नंदू मस्के, राजू खैरनार, शिवनारायण मिश्रा, विकास चव्हाण, ताहेर शेख यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.