Bhosari : कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि. 2) दुपारी अनुकूल चौक, टेल्को रोड येथे झाला.

करण बसप्पा वग्गे (वय 42, रा. गांधीनगर, पिंपरी), असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी बाबू ईश्वर दोडमणे (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी देविदास विश्वनाथ अस्वरे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास करण  वग्गे टेल्को रोडवरील अनुकूल चौकात दुचाकीवरून रस्ता ओलांडत होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या आरोपीच्या कारने (एम \एच 14 / एई 8227) वग्गे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात वग्गे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.