Bhosari : पैसे चोरताना बघणा-या एकाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – पैसे चोरताना एकाने चोरट्याला बघितले. चोरी करणा-या चोराला जाब विचारला म्हणून चोरट्याने जाब विचारणा-याला कोयत्याने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 20) कासारवाडी येथील महाराष्ट्र बँकेसमोर घडली.

दीपक विष्णू गायकवाड (वय 38, रा. कासारवाडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शाहरुख उर्फ बादशाह सलीम शेख (रा. काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख एका झोपलेल्या व्यक्तीच्या खिशातून पैसे चोरत होता. त्याला पैसे चोरताना दीपक यांनी बघितले. पैसे चोरताना दीपक यांनी शाहरुख याला हटकले.
या कारणावरून शाहरुख याने दीपक यांच्या हातावर आणि डोक्यात कोयत्याने मारले. यामध्ये दीपक गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.