Bhosari : सूरज लांडगे यांची युवासेनेच्या जिल्हा युवा अधिकारीपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज – खेड, आळंदी व भोसरीच्या शिवसेना जिल्हा युवा अधिकारीपदी सूरज लांडगे यांची नियुक्ती केली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पक्ष संघटन वाढीसाठी शिवसेनेने नवीन नियुक्त्या केल्या आहेत.

भोसरी परिसरात सामाजिक व राजकीय कार्यात सक्रीय असलेले सूरज लांडगे यांच्यावर खेड, आळंदी व भोसरीची जबाबदारी देण्यात आली आहे. निवडीबाबत बोलताना सूरज लांडगे यांनी युवकांच्या प्रश्नांला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामशेठ गावडे, शिरुर लोकसभा संपर्क प्रमुख व राज्य विस्तारक राज कुळकर्णी, आबा लांडगे, शिवसेना महिला आघाडी संघटिका सुलभा उबाळे यांचे सहकार्य वेळोवेळी मिळाले असे लांडगे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.