Bhosari : पिस्टलच्या धाकाने मजुराला धमकी

एमपीसी न्यूज – इथे राहायचे असेल तर आम्हाला पैसे द्यायचे ( Bhosari) असे म्हणत पिस्टलचा धाक दाखवत मजुराला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 8 फेब्रुवारी रोजी रात्री सदगुरु कॉलनी, भोसरी येथे घडली.

पिराप्पा उर्फ सचिन जगन्नाथ येरे (वय 19), तेजस चंद्रकांत डोंगरे (वय 19), विजय चव्हाण, निळ्या साळवे (सर्व रा. भोसरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिराप्पा आणि तेजस या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी सिराजुल मयलुद्दिन (वय 18, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Wakad : खोली खाली करण्यास सांगितल्याने घर मालकाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या तोंडओळखीचे आरोपी यांनी फिर्यादीस ‘इथे राहायचे असेल तर आम्हाला पैसे द्यायचे’ अशी धमकी देत मारहाण केली. त्यानंतर पिराप्पा याने पिस्टल दाखवून फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्या खिशातून 500 रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आरोपींनी पिस्टलच्या धाकाने परिसरात दहशत निर्माण केली. पोलिसात तक्रार दिल्यास बघून घेईन अशी देखील आरोपींनी धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत ( Bhosari) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.