Pune : मृत बिबट्याचे चार नखे, एक पंजा चोरीला; वन विभागाकडून गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – वनपरिक्षेत्र पुणे अंतर्गत हवेली (Pune)तालुक्यातील मौजे वडगाव शिंदे येथे मृत झालेल्या बिबट्याचे अवयव चोरल्याप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

नवनाथ खांदवे यांच्या शेतात 8 फेब्रुवारी रोजी एक (Pune)मादी बिबट्या मृत आढळला. वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन 10 महिने वयाचा मृत मादी बिबट्या ताब्यात घेतला. 8 फेब्रुवारी रोजी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचे पायाची 3 नखे व पंजा धारधार शस्त्राने कापून काढल्याचे दिसून आले. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन श्वान पथकच्या साहाय्याने तपास केला.

Pune : पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

ऊसतोडणी मजूर यांच्याकडे चौकशी केली असता एका अल्पवयीन मुलाने वडिलांच्या व सोबतच्या 2 अल्पवयीन मुलांच्या मदतीने मृत बिबट्याचे 3 नखे व पायाचा पंजा व त्याचे 1 नख अशी एकूण 4 नखे कोयता व सुरीच्या साहाय्याने कापून लपवून ठेवल्याचे सांगितले. तसेच बिबटच्या नखाचे गळ्यातील लॉकेट बनविण्याच्या उद्देशाने आकर्षणापोटी गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपी कडून 4 बिबट नखे 1 पायाचा पंजा व गुन्ह्यात वापरलेले 2 सुरे जप्त करण्यात आले आहेत. आरोपी कांतीलाल चांदरसिंग सोनवणे आणि 2 बालअपचारी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.