Wakad : खोली खाली करण्यास सांगितल्याने घर मालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – भाड्याने राहणाऱ्या कुटुंबाला घर (Wakad ) खाली करण्याबाबत सांगितले असता भाडेकरू कुटुंबाने त्यांच्या सहकाऱ्यांना बोलावून घर मालकाला बेदम मारहाण करून खोलीवर कब्जा केला. ही घटना 21 नोव्हेंबर 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीत यमुनानगर वाकड येथे घडली.

याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्यंकटेश टिकेकर, दीपक व्यंकटेश टिकेकर, प्रकाश व्यंकटेश टिकेकर, सिद्धू गोगेकर, ऋतेश गोगेकर, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : पहिल्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व्यंकटेश टिकेकर आणि त्यांचे कुटुंबीय फिर्यादी महिलेच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहत होते. त्यांना खोली कधी खाली करणार असे विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपींनी फिर्यादीस लाकडी बांबूने मारहाण केली. ‘रूम खाली करणार नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्हाला जेलमध्ये टाकू. तुम्हाला संपवून टाकू अशी कोयता दाखवून धमकी दिली. त्यांनतर सर्व आरोपींनी फिर्यादी यांच्या मालकीच्या खोलीवर कब्जा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत (Wakad ) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.