Bhosari News : नेपाळी महिलेसोबत बोलल्याने तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – नेपाळी महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 4) रात्री साडेदहा वाजता एमआयडीसी भोसरी येथे घडली.

अमर गौतम कसबे (वय 22, रा. पांडवनगर, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. 5) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू थापा (वय 30, रा. नेहरूनगर, पिंपरी) आणि त्याच्या तीन नेपाळी मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कसबे हे एका दुकानात काम करतात. मंगळवारी रात्री साडेदहा वाजता ते एमआयडीसी भोसरी मधील यशवंत चौकातील टपरीजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. ‘हमारे नेपाली औरत के साथ क्यू बात करता है’ असे म्हणून हाताने मारहाण केली. त्यांनतर एकाने फिर्यादी यांना दगडाने मारून जखमी केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.