BNR-HDR-TOP-Mobile

Bhosari : भोसरीत बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी तरुण अटकेत

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी 25 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने केली.

सुदर्शन उर्फ पिन्या संभाजी राक्षे (वय 25, रा. शास्त्री चौक, आंनदनगर, भोसरी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी गणेश पंढरीनाथ सावंत यांनी फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत सुदर्शन याला भोसरीमधून दुचाकीसह ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे लोखंडी कोयता सापडला. त्यामुळे त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गाढवे करीत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
.