Bhosari : नोकरीच्या आमिषाने तरुणाला दोन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज- नोकरीच्या आमिषाने दोघांनी तरुणाला दोन लाखांचा गंडा घातला. या प्रकरणी गुरुवारी (दि.28) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक केली आहे.

या प्रकरणी अरुण कैलास शिंदे (वय 24, रा.जाधववाडी, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रविराज राजीव गायकवाड (वय 23), रोहन मोहन पवार (वय 24, दोघे रा.अकलूज, सोलापूर) यांना अटक करण्यात आली.

आरोपी यांनी आपापसात संगनमत करून शिंदे यांना नामांकित कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी वेळोवेळी पैशांची मागणी केली. शिंदे यांनी त्यांना 1 लाख 80 हजार रुपये दिले. पैसे घेतल्यांनंतर आरोपींनी नोकरी न लावता फसवणूक केली. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असता दोघांना अटक केली असून उपनिरीक्षक गिरनार पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.