Bihar Election 2020 : तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहारमधील जंगलराज संपुष्टात येऊन मंगलराज सुरू होईल – संजय राऊत

एमपीसी न्यूज – बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महाआघाडीला कौल मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

महाआघाडी आणि एनडीएच्या अटीतटीच्या लढतीत सध्यातरी महाआघाडी पुढे आहे. पहिल्या टप्प्यातल्या मतमोजणी वर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं असून या निवडणुकीच्या निमित्ताने तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात बिहारमधील जंगल राज संपुष्टात येईल आणि मंगलराज सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

_MPC_DIR_MPU_II

संजय राऊत म्हणाले, एका तरुण नेत्याने ज्याचा काल 31 वा वाढदिवस झाला त्यांनी केंद्रातील मोठ्या नेत्यांना आव्हान देऊन बिहारमध्ये ताकद उभी केली. ज्या प्रकारची टक्कर तो देतोय ते पाहता बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू व्हायला हरकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, नितिष कुमार असतील किंवा भाजपचे इतर मंत्री असतील त्यांनी बिहारच्या प्रचारात वारंवार जंगलराजचा उल्लेख केला. पण जेव्हा संपूर्ण निकाल हातात येईल तेव्हा जंगलराज संपूर्णपणे संपलेला असेल आणि मंगलराज सुरू झालेले असेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.