BJP : बाळासाहेब ठाकरे असते तर जितेंद्र आव्हाड यांचे काय झाले असते? – डॉ.संजय पांडे

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड (BJP)यांनी प्रभू श्रीरामाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर उद्धव ठाकरे एक शब्दही बोलले नाहीत.

आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आव्हाडांचे काय झाले असते? याची कल्पना करा? उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता सोनिया सेना झाली आहे. हळूहळू अधोगतीकडे जात असल्याची टीका प्रदेश भाजपा उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ.संजय पांडे यांनी केली.

पिंपरी-चिंचवड भाजप उत्तर भारतीय आघाडीची जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात(BJP) आली. सर्व नवनियुक्त पदाधिकार्‍यांना डॉ. संजय पांडे व भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. जंबो कार्यकारिणीमध्ये सरचिटणीस-4, उपाध्यक्ष-12, सचिव-13, सल्लागार समिती-15 अधिकार्‍यांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा समन्वयक युवा सेलचीही स्थापना करण्यात आली. वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, भाजपा उत्तर भारतीय मोर्चा पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आकाश भारती, माजी नगरसेविका ज्योती भारती, पुणे जिल्हा प्रभारी नवीन सिंह, प्रदेश सरचिटणीस पद्युमन शुक्ला,  प्रदेश उपाध्यक्ष कपिल वर्मा, राजीव रतन मिश्रा, प्रदेश सचिव चंद्रप्रकाश मिश्रा, प्रदेश सचिव नितीश वर्मा, प्रदेश प्रवक्ते विनोद उपाध्याय, स्थलांतर प्रमुख शैलेश मिश्रा, राज्य स्थलांतर प्रमुख भोवल सिंह, प्रदेश उत्तर भारतीय मोर्चा महिला संयोजक प्रीती आहुजा, सहसंयोजिका रंभा सिंह,भाजपा शहर सरचिटणीस संजय मंगोडेकर, विश्व श्री राम सेना सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष तथा उद्योजक प्रमोद गुप्ता आदी उपस्थित होते.

Pune : पुणे महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर

डॉ.संजय पांडे म्हणाले की, काही लोक प्रांतवाद पाळतात, समाजातील काही घटक राजकारण करतात आणि उत्तर भारतीयांना परप्रांतीय संबोधतात. अशा काट्यांना सांगावेसे वाटते की, आपल्या पूर्वजांनी आपल्या रक्त आणि घामाने महाराष्ट्राला विकसित केले. दगडात फुले उगवण्याचे काम केले. म्हणूनच आपण प्रांतीय नसून घरप्रांतीय आहोत.

शहर भाजप अध्यक्ष शंकर जगताप आपल्या भाषणात म्हणाले की, आधी राष्ट्र, मग पक्ष, मग मी, सर्व पदाधिकार्‍यांनी या मूळ मंत्राखाली काम केले पाहिजे. पक्षाचा दुपटा मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे. आधी भाजपचे 2 खासदार, नंतर 200, 300 आणि आता 400 पार करण्याची शपथ घ्या. 2047 पर्यंत भारताला जगातील महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान कार्यरत आहेत. प्रत्येक नागरिकाच्या मनात देशभक्तीची भावना असली पाहिजे.

 

मालदीय वादानंतर 2000 हून अधिक लोकांनी बुकिंग रद्द केल्याचे दिसून आले. देशाप्रती फक्त देशभक्ती असते. केंद्र, राज्य आणि महापालिकेच्या लोककल्याणकारी योजना प्रत्येक घराघरात पोहोचवायला हव्यात. जगातील देशांच्या तुलनेत देशाची अर्थव्यवस्था तिसर्‍या क्रमांकावर आहे. देशाला जागतिक बनवण्याचे स्वप्न पंतप्रधान मोदी यांनी पाहिले असून ते आपण सर्वांनी मिळून पूर्ण करायचे आहे. आकाश भारतीने आपल्या मोर्चात सर्व धर्म आणि जातीच्या लोकांना सामील केले आहे. सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 22 जानेवारीला दिवाळी साजरी करावी.

आकाश भारती यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल व पुणेरी पगडी देऊन स्वागत केले. राजेश बडगुजर यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.