Pune : भाजपने विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते पद द्यावे – विनायक मेटे

एमपीसी न्यूज – भाजपने पाच वर्ष आश्वासन देऊनही सत्तेपासून दूर ठेवले. हा एक प्रकारे अन्याय झाला असून, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद आम्हाला द्यावे, अशी मागणी शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केली.

विधान परिषद विरोधी पक्षनेते पदासाठी आमच्या पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही मेटे यांनी सांगितले. पुण्यात शिवसंग्राम पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवसंग्रामच्या आमदारांसह राज्यभरातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, प्रकाश मेहता असे अनेक दिगग्ज मंडळी पक्षावर नाराज आहेत. ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता भाजपच्या छोट्या घटक पक्षांनीही नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.