Pune : महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करत आहेत : चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपात जाणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरु होत्या. परंतु, अजित पवारांनी या चर्चा फेटाळून लावत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भाजप प्रवेशाच्या या चर्चा काही थांबण्याचे नाव घेत नाही.(Pune) यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडीचे नेते अजित दादांना बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Manish Umbrajkar : जेष्ठ पत्रकार मनीष उंब्रजकर यांचे निधन

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आज पुण्यात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीनी विचारला असता ते म्हणाले की,मागील तीन महिन्यापासून अजितदादा मला भेटले नाहीत.(Pune) मागील अधिवेशन काळात माझी आणि अजित पवार यांची भेट झाली होती. तसेच अजितदादांना जाणीवपूर्वक पहाटेच्या शपथ विधीपासून त्यांच्या जीवनावर,त्यांच्या भूमिकेवर आणि कामावर प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. महाविकास आघाडीतील नेतेच अजितदादांना जाणीवपूर्वक बदनाम करित आहे.त्याचबरोबर अजितदादांनी आमच्याशी कोणत्याही प्रकाराचा संपर्क केला नसल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.