Blood Donation: सांगवीतील शिबिरात 141 जणांचे रक्तदान

Blood donation of 141 people in Sangvi camp

एमपीसी न्यूज- सांगवी परिसर महेश मंडळातर्फे समाजउत्पत्ती दिनानिमित्त कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ आयोजित 20 व्या रक्तदान शिबिरात 141 जणांनी रक्तदान केले.

राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड- 19 च्या सर्व नियमांचे पालन करीत पिंपळेगुरव येथील निळू फुले नाट्यगृहातील बहुउद्देशीय हॉलमध्ये हे शिबिर पार पडले.

तत्पूर्वी सांगवी येथील माहेश्वरी चौकातील भगवान शंकराच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. नगरसेविका शारदा सोनवणे यांनी रक्तदान केले.

यावेळी नगरसेवक हर्षल ढोरे, पुणे जिल्हा माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष गोविंद मुंदडा सतीश लोहिया, पंकज चांडक आदी उपस्थित होते.

रक्तदान शिबिरात 141 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तसंकलनसाठी केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढ़ीने सहकार्य केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी निलेश अटल, दीपेश मालानी, भूषण हरकुट, पंकज टावरी, गणेश, तुषार माहेश्वरी, विवेक झंवर यांनी सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.