Talegaon Dabhade : वसिम शेख ज्युनिअर महाराष्ट्र श्री 2019 चा विजेता

ज्युनिअर महाराष्ट्र श्री 2019'राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील जेडी फिटनेसचा वसिम शेख हा ज्यु. महाराष्ट्र श्री 2019 चा विजेता ठरला असून जम्मू कश्मिर येथे 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ज्यु. मिस्टर इंडीया स्पर्धेसाठी त्याची राज्यातून निवड झाली आहे.या स्पर्धेस चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती स्पर्धेचे मुख्य संयोजक जय दाभाडे,विक्रम भिडे आणि रवींद्र काळोखे यांनी दिली.
वसीम शेख याने केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व केले आहे.तळेगाव स्टेशन येथील आर.के.आर्केड मैदानावर रविवारी ‘ ज्यु.महाराष्ट्र श्री 2019’राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव आणि फिटनेस स्पर्धा संपन्न झाल्या.या स्पर्धेत ज्युनिअर महाराष्ट्र श्री 2019 चॅम्पियन ऑफ चॅम्पियन वसिम शेख( पुणे ),बेस्ट पोझर राज प्रकाश सुर्वे( मुंबई) ,मोस्ट इमप्रुड बॉडी बिल्डर- सुनीत बंगेरा (पश्चिम ठाणे ),टीम चॅम्पियनशिप (पश्चिम ठाणे ) यांनी विशेष नैपुण्य प्राप्त केले.
42 वी ज्युनियर, 25 वी मास्टर्स, 17 वी  फिजिकली चॅलेंज, पहिली ज्युनियर मेन्स क्लासिक बॉडीबिल्डींग आणि  पहिली ज्युनियर मेन्स फिजिक्स या स्पर्धेत खेळाडू मोठया संख्येने सहभागी झाले होते.पंच म्हणून डॉ.संजय मोरे,राजेश सावंत,राजेंद्र सातपूरकर यांनी काम पाहिले.स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी संत तुकाराम सहकारी सुखार कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे,माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे,
उपनगराध्यक्ष संग्राम काकडे,माजी उपनगराध्यक्ष आणि विद्यामान नगरसेवक सुनील शेळके,माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे,शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक काळोखे,भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, उद्योजक अंताराम काकडे,कामगार नेते दीपक दाभाडे,तळेगाव दाभाडे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष विलास भेगडे,ऋषीकेश लोंढे,संदीप भेगडे,महेश भागीवंत,मंगेश फल्ले,काकासाहेब काळे,यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते विजेत्या  स्पर्धकास  पारितोषिके  देण्यात आली.सुत्रसंचालन अनील धर्माधिकारी आणि राजेंद्र सातपुरकर यांनी केले.स्पर्धेचे आयोजन डॉ.संजय मोरे आणि महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे खजिनदार राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जेडी फिटनेसचे जय दाभाडे ,रवींद्र काळोखे  आणि दिघी येथील अल्टिमेट फिटनेसचे विक्रम भिडे यांनी केले.उत्कृष्ट नियोजन पहाण्यास मिळाले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
फिजिकली चॅलेंज:
प्रथम- योगेश मेहेर(पश्चिम ठाणे),
द्वितीय-प्रकाश राजपुरे( पुणे),
तृतीय- सागर चव्हाण (पिंपरी-चिंचवड),
चतुर्थ-  प्रतीक मोहिते (रायगड), पंचम – अक्षय शेजवळ (मुंबई).
मेन्स फिजिक्स :
प्रथम- विशाल कौटकर(नाशिक ),
द्वितीय-आकाश दडमल( पुणे) ,
तृतीय -यश कोळी (मुंबई),
चतुर्थ- अमित अंगरे (पश्चिम ठाणे),
पंचम – रतवेश सिंग(पश्चिम ठाणे).
मेन्स क्लासिक:
प्रथमअजय शेट्टी(पश्चिमठाणे),
द्वितीय-रणजीत भोईर(रायगड),
तृतीय-अमोल दरगे(मुंबई),
चतुर्थ -आदम बागवान (अहमदनगर),
पंचम – चिन्मय राणे(पश्चिम ठाणे).
मास्टर स्पर्धा – 40 वर्षांवरील:
प्रथम- विकटर किणी (पश्चिम ठाणे),
द्वितीय- त्रिपाठी शिवअसरी( पश्चिम ठाणे),
तृतीय-  माणिक  जरे( पिंपरी- चिंचवड),
चतुर्थ – विश्वनाथ ढोणे(पुणे),
पंचम – उत्तम जाधव (मुंबई ).
50 वर्षांवरील: प्रथम-
संतोष सिंग(पुणे),
द्वितीय- नितीन मोरे (पश्चिम ठाणे ),
तृतीय -सतीश चंद्र( पुणे),
चतुर्थ-  राजेश बाबर (मुंबई),
पंचम –  शशिकांत जगदाळे (पालघर ).
55 किलो वजनगट :
प्रथम – विक्रम पाटील (कोल्हापूर),

द्वितीय -नितेश सोडे (पुणे),
तृतीय- जुगल शेवाळे (रायगड),
चतुर्थ- नरेश पवार (रायगड ),
पंचम- संजय भोपी(रायगड ).
60 किलो वजनगट:
 प्रथम -तुषार ठाकुर( मुंबई),
द्वितीय- अजित चव्हाण (मुंबई ),
तृतीय – योगेश पाटील (रायगड),
चतुर्थ-मुनसिंग लगडेवाला( सोलापूर),
पंचम- अमोल राऊळ(कोल्हापूर).
 65 किलो वजनगट:
प्रथम- भिकाजी कांबळे (कोल्हापूर),
द्वितीय-दिलखुश म्हात्रे(रायगड),
तृतीय-हिमांशू मकवाना (मुंबई),
चतुर्थ-सुरज सकपाळ(कोल्हापूर),
पंचम-योगेश गायकवाड (पुणे).
70 किलो वजनगट:
 प्रथम- सुनीत  वंगेरा( पश्चिम ठाणे),
द्वितीय -,धीरज शिंदे (सांगली),
तृतीय -महेश गाडे (सोलापूर),
चतुर्थ: शुभम जाधव (कोल्हापूर)
पंचम- सुरज पवार (सांगली)
75किलो वजनगट:
 प्रथम- वसीम शेख (पुणे),
द्वितीय-हर्षद मेवेकरी (सांगली),
तृतीय- रोहित दळवी (कोल्हापूर),
चतुर्थ – आकाश मिरकुटे (कोल्हापूर),
पंचम -युवराज मोरे (कोल्हापूर )
80किलो वजनगट:
 प्रथम – राज  सुर्वे (मुंबई),
द्वितीय – सुशांत किणी(पश्चिम ठाणे),
तृतीय -ओंकार साळुंखे( कोल्हापूर ),
चतुर्थ – हर्षवर्धन लोंढे( सोलापूर),
पंचम- सुरज महाराणा (पुणे).
85 किलो वजनगट :
प्रथम -ओंकार कापरे( कोल्हापूर),
द्वितीय -नितेश सिंग (पश्चिम ठाणे),
तृतीय- आकाश इंगळे (सोलापूर ),
चतुर्थ- जासिफ  पठाण (अहमदनगर) ,
पंचम -प्रणव पाटोळे (पुणे )

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.