Bollywood: मातृदिनानिमित्त आयुषमान खुराणानं गायलं खास भारतमातेसाठी गाणं

Bollywood: Ayushman Khurrana's special song for Mother's Day

एमपीसी न्यूज – सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींसाठीही त्यांची आई खास असते.  विशेष म्हणजे यंदा अभिनेता आयुषमान खुरानाने ‘मदर्स डे’चं निमित्त साधत आपल्या भारतमातेसाठी आणि समस्त आईवर्गासाठी एक खास गाणं तयार केलं आहे.

आज मातृदिन. आई या दोन अक्षरी शब्दात सगळं विश्व सामावलेलं असतं. गणरायाने देखील पृथ्वीप्रदक्षिणेचे पुण्य मिळवण्यासाठी आई वडिलांना प्रदक्षिणा घातली होती. आपल्या लहानपणापासून आपले आईशी एक वेगळे बॉन्डिंग असते. कधी हट्ट करुन तरं कधी लाडीगोडी लावून आपण आपल्या मनासारख्या गोष्टी फक्त आईकडूनच करुन घेऊ शकतो. बाबा त्यामानाने थोडे दूर असतात.

प्रत्येकाच्या जीवनात आईचं एक अनन्यसाधारण स्थान असतं. दिवस-रात्र कष्ट करणाऱ्या आईचे आभार मानण्यासाठी, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण त्यांना शक्य होईल त्यानुसार आईला शुभेच्छा देतात.

एक उत्तम गायक असलेला आयुषमान नेहमीच काहीतरी हटके करत असतो. त्यामुले सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात त्याने मदर्स डेसाठी ‘माँ’ हे खास गाणं तयार केलं असून मदर्स डेच्या दिवशी (१० मे) हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यापूर्वी त्याने या गाण्याची एक झलक सादर केली आहे.

“एक आई आपल्या मुलांसाठी वाट्टेल ते करायला तयार असते. त्यांच्यावर ती निस्वार्थ प्रेम करते, त्यांच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करते. त्यामुळे खरं तर प्रत्येक दिवशी मदर्स डे साजरा केला पाहिजे. मात्र ठीक आहे हा एक दिवसदेखील तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी पुरेसा आहे. त्यामुळे निदान या दिवशी तरी आपण तिच्यासाठी काही तरी करावं”, असं आयुषमान म्हणाला.

पुढे तो म्हणतो, “यंदाच्या मदर्स डेला मी सगळ्या मातांना, आईंना उद्देशून ‘माँ’ हे गाणं तयार केलं आहे. आईचं जे प्रेम, जी ममता असते ते पाहून मी कायम थक्क होतो. त्यामुळे माझी बरीचशी गाणी आईला समर्पित केलेली असतात”. या गाण्याला संगीतकार रोचक कोहली याने  संगीत दिलं असून या गाण्याचे बोल गुरप्रीत सैनीने लिहिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.