Audi Q3 : ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंगला सुरुवात

एमपीसी न्यूज : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक (Audi Q3) कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंग्जना सुरूवात केली. नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक व्यावहारिक, स्पोर्टी व आकर्षक आहे. प्रमाणित म्हणून क्वॉट्रो ऑल- व्हील ड्राइव्हसह सुसज्ज ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकमध्ये 2.0 लिटर टीएफएसआय पेट्रोल इंजिनची शक्ती आहे. हे इंजिन 190 एचपी शक्ती आणि 320 एनएम टॉर्कची निर्मिती करते. नवीन ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक 2 लाख रूपयांच्या सुरूवातीच्या रक्कमेमध्ये बुक करता येऊ शकते.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले, ‘‘2023 साठी आमचे पहिले लाँच बॅज असेल, जे भारतात आमचे बेस्ट-सेलर राहिले आहे. आज, आम्हाला फर्स्ट-इन-द-सेगमेंट असलेली बॉडी टाइप-ऑल-न्यू ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅकसाठी बुकिंग्जचा शुभारंभ करण्‍याचा आनंद होत आहे.

ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक कार्यक्षमता व अधिक उच्च दर्जाची डिझाइन असलेली दैनंदिन वापराकरिता कारचा शोध घेत असलेल्या ग्राहकांना आवडेल.’’

श्री. धिल्लों पुढे म्हणाले, ‘‘आम्हाला 2022 मध्ये 27 टक्के वाढ दिसण्यात आली आणि विश्वास आहे की 2023 मध्ये देखील काही वेगळे नसणार. ऑडी क्यू 3 स्पोर्टबॅक सारख्या (Audi Q3) उत्पादनांसह आम्ही यावर्षी दोन-अंकी वाढीची अपेक्षा करत आहोत.’’

नवीन ऑडी क्यू३ स्पोर्टबॅक टर्बो ब्ल्यू, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवेरा ब्ल्यू. उपलब्ध इंटीरिअर रंग पर्याय आहेत – ओकापी ब्राऊन आणि पर्ल बिज या पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल. ऑडी इंडिया वेबसाइट (www.audi.in) आणि ‘मायऑडी कनेक्ट’ अॅपच्या माध्यमातून ऑनलाइन बुकिंग्ज करता येईल.

ही विभागातील पहिली कॉम्पॅक्ट कूपे क्रॉसओव्हर आहे. या कारच्या एक्स्टीरिअर वैशिष्ट्यांमध्ये एलईडी हेडलाइट्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स, पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ, कम्फर्ट की सह गेस्चर-कंट्रोल्ड टेलगेट, 5 स्पोक व्ही स्टाइल ‘एस डिझाइन’ आर 18 अलॉई व्हील्स आणि हाय ग्लॉस स्टायलिंग पॅकेज आदींचा समावेश आहे.

तसेच इंटीरिअर वैशिष्ट्यांमध्ये ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस, एमएमआय नेव्हिगेशन प्लस सह एमएमआय टच, ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट, ऑडी फोन बॉक्स सह वायरलेस चार्जिंग, 2-झोन क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लंबर सपोर्ट, अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस आणि ऑडी साऊंड सिस्टम देण्यात आले आहे.

Chinchwad Bye Election: महाविकास आघाडीत बंडखोरी; राहुल कलाटे उमेदवारी अर्ज भरणार

 

वैशिष्‍ट्यांची यादी: Audi Q3 

ड्राइव्‍हेबिलिटी

· 2.0 लिटर टीएफएसआय इंजिन । 140 केडब्‍ल्‍यू (190 एचपी) । 320 एनएम । 7.3 सेकंदांमध्‍ये 0 ते 100 किमी/तास

· क्‍वॉट्रो – ऑल व्‍हील ड्राइव्‍ह

· 7 स्‍पीड एस ट्रॉनिक ट्रान्‍समिशन

· ऑडी ड्राइव्‍ह सिलेक्‍ट

· प्रोग्रेसिव्‍ह स्‍टीअरिंग

· कम्‍पर्ट सस्‍पेंशन

· हिल स्‍टार्ट असिस्‍ट

· क्रूझ कंट्रोल सिस्‍टमसह स्‍पीड लिमिटर – Audi Q3

· लेदरने रॅप केलेले 3 स्‍पोक मल्‍टीफंक्‍शन प्‍लस स्‍टीअरिंग व्‍हीलसह पॅडल शिफ्टर्स

एक्‍स्‍टीरिअर

· एस-लाइन एक्‍स्‍टीरिअर पॅकेज

· 45.72 सेमी (आर 18) 5-स्‍पोक व्‍ही-स्‍टाइल (‘एस’ डिझाइन) अलॉई व्‍हील्‍स

· पॅनोरॅमिक ग्‍लास सनरूफ

· एलईडी हेडलॅम्‍प्स

· एलईडी रिअर कॉम्‍बीनेशन लॅम्‍प्‍ससह डायनॅमिक टर्न इंडिकेटर्स

· हाय ग्‍लॉस स्‍टायलिंग पॅकेज

इंटीरिअर

· अॅम्बियण्‍ट लायटिंग पॅकेज प्‍लस (30 रंग)

· पॉवर अॅडजस्‍टेबल फ्रण्‍ट सीट्ससह 4 वे लंबर सपोर्ट

· लेदर लेदरेट कॉम्‍बीनेशनमध्‍ये सीट अपहोल्‍स्‍टरी

· रिअर सीट प्‍लससह फोअर /आफ्ट अॅडजस्‍टमेंट

· अॅल्‍युमिनिअम लुकमध्‍ये इंटीरिअर

· मायक्रो-मेटालिक सिल्‍व्‍हरमध्‍ये डेकोरेटिव्‍ह इनसर्ट्स

· फ्रण्‍ट डोअर स्‍कफ प्‍लेट्स, अॅल्‍युमिनिअम इनसर्टस्, ‘एस’ लोगोसह प्रकाशित

वैशिष्‍ट्ये

· 25.65 सेमी (10.1 इंच) एमएमआय नेव्हिगेशन प्‍लससह एमएमआय टच

· ऑडी व्‍हर्च्‍युअल कॉकपीट प्‍लस

· ऑडी साऊंड सिस्‍टम (10 स्‍पीकर्स, 6 चॅनेल अॅम्प्लिफायर, 180 वॅट)

· ऑडी फोन बॉक्‍ससह वायरलेस चार्जिंग सिस्‍टम

· ऑडी स्‍मार्टफोन इंटरफेस

· 2-झोन क्‍लायमेट कंट्रोल सिस्‍टम – Audi Q3

· पार्किंग एड प्‍लससह रिअर व्‍ह्यू कॅमेरा

· कम्‍फर्ट की सह गेस्‍चर कंट्रोल्‍ड टेलगेट

· इलेक्ट्रिकली चालू-बंद होणारे लगेज कम्‍पार्टमेंट लिड

· एक्‍स्‍टीरिअर मिरर्स, पॉवर-अॅडजस्‍टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्‍ही बाजूंनी ऑटो-डिमिंग

· फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर-व्‍ह्यू मिरर

· स्‍टोरेज व लगेज कम्‍पार्टमेंअ पॅकेज

· 6 एअरबॅग्ज

· टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्‍टम

· आयएसओएफआयएक्‍स चाइल्‍ड सीट अँर्क्‍स आणि आऊटर रिअर सीट्ससाठी टॉप टेथर

· अॅण्‍टी-थेफ्ट व्‍हील बोल्‍ट्स आणि स्‍पेस वाचवणारे स्‍पेअर व्‍हील

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.