Chinchwad Bye Election: महाविकास आघाडीत बंडखोरी; राहुल कलाटे उमेदवारी अर्ज भरणार

एमपीसी न्यूज – महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Chinchwad Bye Election) उमेदवारीसाठी डावलल्यानंतर शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. कलाटे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत. कलाटे यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठींबा मिळण्याची शक्यता आहे.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर चिंचवड मतदार संघाच्या रिक्त जागेसाठी नाना काटे यांच्या नावाची राष्ट्रवादीकडून घोषणा करण्यात आली आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना कडवी झुंज देणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्नशील होते.

पण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षातील इच्छुकालाच उमेदवारी द्यावी. पक्षाबाहेरील इच्छुकाला उमेदवारी देवू नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली होती. अखेरीस अजितदादांनी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते असलेल्या नाना काटे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ (Chinchwad Bye Election) टाकली.

Pune Bye-Election : काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी कसब्यातून केला अर्ज दाखल

या जागेसाठी नाना काटे आणि राहुल कलाटे ही दोन नाव सुरुवातीपासून चर्चेत होती. राहुल कलाटे यांचे नाव आघाडीवर होते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राहुल कलाटे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. वाकड येथून मोठी रॅली काढत समर्थकांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.