Bullet theft : मेदनकरवाडीमधून बुलेट चोरीला

एमपीसी न्यूज – मेदनकरवाडीमधून (Bullet theft) चोरट्याने बुलेट दुचाकी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.

अजित जयभरात उमरीकर (वय 36 रा. टूलिप होम्स सोसायटी, मेदनकरवाडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosri : अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 90 हजार रुपये (Bullet theft) किमतीची बुलेट दुचाकी (एमएच 14 / एचसी 1664) सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. गुरुवारी रात्री नऊ ते शुक्रवारी सकाळी सव्वानऊ वाजताच्या कालावधीत चोरट्यांनी दुचाकीचे हॅण्डल लॉक तोडून दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.