Dehu Road Accident: कारच्या धडकेत दोन दुचाकीस्वार वृद्धांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दुचाकीवरून जात असेलल्या दोन वृद्धांना एका कारने जोरात धडक दिली. त्यात दोन्ही वृद्धांचा मृत्यू झाला. (Dehu Road Accident) ही घटना गुरुवारी दि. 14 रोजी सकाळी पावणे अकरा वाजता गार्डन सिटी समोर देहूरोड-निगडी दरम्यान घडली.

 

शंकर सखाराम शिंदे (वय 80), नरसिमन गुंडराम (वय 83, दोघे रा. मामुर्डी, देहूरोड) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सागर नेताजी शिंदे (वय 29, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कार (एमएच 14/जीएच 2914) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 Bhosari Crime: गांजा सेवन करणाऱ्या एकास अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे चुलते शंकर शिंदे आणि त्यांचे मित्र नरसिमन हे दोघे मोपेड दुचाकीवरून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून देहूरोड येथून निगडीला जात होते. गार्डन सिटी समोर आल्यानंतर आरोपीने कार भरधाव वेगात चालवून दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यात दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे. तसेच अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.