Chakan crime : ट्रान्सपोर्टरकडून रोख रक्कम व सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज :  ट्रान्सपोर्टर कडून 2 लाख रोख रक्कम, 60 हजाराची सोन्याची चेन चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Chakan crime) ही घटना आंबेठाण गावाच्या हद्दीत, कोरेगाव फाटा रोडवर रुद्र ट्रान्सपोर्ट ऑफिस समोर घडली. 15 नोव्हेंबर ला मध्यरात्री 12.45 वा सुमारास हा सर्व प्रकार घडला.

याबाबत संदिप पडवळ, वय 27 वर्ष, रा. बोरदरा, सायगर वस्ती, ता. खेड, जि. पुणे यांनी चाकण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोहित कोळेकर, रा. करंजविहीरे, ता. खेड, जि. पुणे व अनोळखी मुलगा (मोहित कोळेकर याचा मित्र) नाव पत्ता माहित नाही या दोन आरोपींच्या विरोधात भा.द.वि कलम विरोधात 392, 34, 427 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC News : ठेकेदाराकडून बेकायदेशीरपणे 23 झाडांची कत्तल अन् पालिकेकडून केवळ ‘एनसी’

फिर्यादी त्यांचे ऑफिस बंद करून घरी निघण्याच्या तयारीत असताना दोन्ही आरोपी फिर्यादी यांच्या ऑफिसचवर दगड मारून ऑफिस समोर असलेली फिर्यादी यांच्या मालकीची मारुती सुझुकी गाडी एम.एच 14 के ए 0134 च्या काचेवर दगड मारून नुकसान केले आहे.

फिर्यादीने या बाबत विचारणा केली असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की केली. तर अरबी मुळे कोळेकर यांनी फिर्यादीच्या पार्टीच्या खिशातील रोख रक्कम 2 लाख रुपये (Chakan crime) जबरदस्तीने काढून घेतले तसेच त्यांच्या घरातील 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चैन गळ्यातून जबरदस्तीने हिसकावून चोरून घेऊन कोरेगाव बाजूकडे पळून गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.