Bharat jodo yatra : राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी 1000 पदाधिकारी, कार्यकर्ते शेगाव कडे रवाना

एमपीसी न्यूज – भारत जोडो यात्रेसाठी निघालेले काँग्रेस नेते खा. राहुल गांधी महाराष्ट्रात असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुणे शहर काँग्रेसचे पदाधिकारी (Bharat jodo yatra) व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होणार आहेत. सुमारे 1000 पदाधिकारी व कार्यकर्ते आज काँग्रेस भवन येथून रवाना झाले. शेगाव येथील जिल्हा परिषदेच्या ग्राऊंडवर राहुल गांधी यांची सभा होणार  आहे.

या ठिकाणी पुण्याच्या ऐतिहासिक व स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित शक्ती स्थळांवरून गोळा केलेली माती व बोधीवृक्ष यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे राहुल गांधी व प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे सुपूर्त करून राहुल गांधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करणार आहेत.

यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे या देशातील धर्मभेद, जातीभेद व तिरस्कार मिटविण्यासाठी भारत जोडो यात्रा करीत आहेत.(Bharat jodo yatra) भाजपाने गेल्या आठ वर्षात देशामध्ये जे तोडण्याचे राजकारण केले आहे. त्यासाठीचे ही भारत जोडो यात्रा करत आहोत. आम्ही देखील खारीचा वाटा म्हणून या यात्रेत सहभागी होत आहे.’’

Chakan crime : ट्रान्सपोर्टरकडून रोख रक्कम व सोनसाखळी चोरी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

यावेळी नगरसेवक अजित दरेकर, रफिक शेख, संगीता तिवारी, सुजित यादव, राजेंद्र भुतडा, द. स. पोळेकर, उमेश कंधारे, संदिप मोकाटे, चैतन्य पुरंदरे, सेल्वराज ॲन्थोनी, भरत सुराणा, विश्वास दिघे, ॲड. भिवसेन रोकडे, गुलाम खान, फैय्याज शेख, स्वाती शिंदे, रेखा घलोत, वैशाली रेड्डी, प्राची दुधाने, पपिता सोनावणे, शिवानी माने, ज्योती चंदवेळ, इंद्रजीत भालेराव आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.