Vadgaon Maval News : शिवशाही मित्र मंडळाकडून अनोख्या पद्धतीने राखी पौर्णिमा साजरी 

एमपीसी न्यूज – रक्षाबंधन सणाचे औचित्य साधत टाकवे बुद्रुक येथील शिवशाही मित्रमंडळाच्या वतीने महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत वडगाव मावळ पोलीस स्टेशन अंकीत आंदर मावळ पोलीस गस्त चौकी फळणे येथे रविवारी चेकपोस्टवर असणाऱ्या पोलीस बांधवाना राखी बांधत अनोख्या पध्दतीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला.

रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिण भावाकडे जाऊन त्याला राखी बांधून आपले रक्षणासाठी साकडे घालत असते. मात्र, कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस बांधवाना या दिवशी देखील आपल्या बहिणीला वेळ देता येत नाही. तसेच चोवीस तास कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस बांधव सर्वसामान्य नागरिकांचे रक्षण करतात. त्यांना राखी बांधणे ही बांधिलकी समजून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. यासाठी शिवशाही मित्रमंडळ महिला समितीच्या वतीने पोलीस बांधवाना राखी बांधत रक्षाबंधन सण साजरा केला.

यावेळी पोलिस नाईक प्रविण विरणक, शशिकांत खोपडे, संजय बगाड, विजय पिचड,पोलिस कर्मचारी उपस्थित होते. तसेच टाकवे ग्रुपग्रामपंचायतीच्या सदस्या व  शिवशाही मित्रमंडळाच्या ज्योती आंबेकर, सुकेशनी जगताप, अलका धामणकर संजना असवले, नेहा आंबेकर आदी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संयोजन शिवशाही मित्र मंडळाकडून स्वामी जगताप,योगेश मोढवे,नवनाथ आंबेकर,प्रदीप मोढवे,रोहिदास खुरसुले आदींनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.