Brahmin Federation : केंद्रीय यंत्रणांकडून ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सतर्क राहण्याचा इशारा

एमपीसी न्यूज – भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मुस्लिम धर्माविषयी केलेल्या एका वक्तव्यावरून देशभरात वादंग निर्माण झाले आहे. नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यांचा समर्थन करणाऱ्या दोघा जणांचा खून करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत ब्राह्मण महासंघाचे  (Brahmin Federation)  अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणांकडून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांकडून आनंद दवे यांना सुरक्षा देण्यात आली आहे. 

 

आनंद दवे हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून त्यांनी अनेकदा आवाज उठवला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील ट्विट करून दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन पुणे पोलिसांना केले होते. त्यानंतर आनंद दवे यांना पुणे पोलिसांनी (Brahmin Federation)  संरक्षण देखील दिले आहे.

 

Monsoon Update : राज्यात मान्सूनची संततधार; पुणे, पिंपरी चिंचवडमध्येही हजेरी

 

 

भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर सोशल मीडियावर काहींनी तिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या होत्या. यानंतर उदयपूर आणि अमरावती येथे समर्थन करणाऱ्या दोघांची निर्गुण हत्या करण्यात आली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.