Chakan : कंपनीचा पत्रा उचकटून सोळा लाखांची वायर लंपास

एमपीसी न्यूज – तिघांनी मिळून कंपनीचा पत्रा उचकटून कंपनीमधून 15 लाख 99 हजार 41 रुपये किमतीचा कॉपर पाईप आणि हार्ड कॉपर फ्लेक्झिबल केबल चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 14) सकाळी निघोजे येथे महेंद्रा टॉवर कंपनीत उघडकीस आली.

वसंत साखरलाल सूर्यवंशी (वय 43, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंत सूर्यवंशी यांची खेड तालुक्यातील निघोजे येथे महेंद्रा टॉवर कंपनी आहे. शनिवारी (दि. 13) रात्री अज्ञात तीन चोरट्यांनी कंपनीचा पत्रा उचकटून कंपनीत प्रवेश केला. कंपनीतील हार्ड कॉपर पाईप आणि हार्ड कॉपर फ्लेक्झिबल केबल असा एकूण 15 लाख 99 हजार 41 रुपये किमतीचा माल चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.