Chakan : अक्षय तृतीया व रमजान ईद उत्साहात साजरी

हिंदू मुस्लीम बांधवानी एकमेकांना दिल्या शुभेच्छा

एमपीसी न्यूज- साडेतीन मुहूर्तांपैकी (Chakan ) एक ‘अक्षय तृतीया’ अणि पवित्र अशा रमजान ईद अर्थात ‘ईद-उल-फित्र’ हे दोन्ही सण काल शनिवारी (दि. 22 एप्रिल ) हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रित साजरे केले. चाकण मधील संग्राम दुर्ग किल्ल्यात शेजारी- शेजारी असलेल्या मंदिरात आणि मशिदीत धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळी सात वाजता येथील दामोदर विष्णू मंदिरात भव्य आरती झाली.  त्यानंतर लगेचच याच मंदिराच्या शेजारी असलेल्या मशिदीच्या समोर भव्य प्रांगणात शेकडो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केले.

Pune : नवले पूल अपघाताबाबत नितीन गडकरींशी चर्चा करणार – सुप्रिया सुळे

एक महिन्याच्या उपवासानंतर आज  रमजान ईद मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली. चाकण मध्ये संग्राम दुर्ग किल्ल्यासह ठिकठिकाणी मशिदिंमध्ये हजारो मुस्लीम बांधवांनी एकत्रित येत सामुहिक नमाज अदा केली.  चाकण शहरात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या एसीपी प्रेरणा कट्टे, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी हिंदू मुस्लिम बांधवांना अक्षय तृतीया आणि ईदच्या शुभेच्छा दिल्या. सकाळी नमाज पठण झाल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. मुस्लिम समाजाच्या तरुण कार्यकर्त्यांनी शहरात शिरखुर्म्याचे कार्यक्रम ठेवले होते. हिंदू मुस्लिम बांधवांनी (Chakan ) एकत्र येत दोन्ही सण अत्यंत उत्साहात साजरे केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.