Chakan : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज- मित्राला घेऊन येण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या (Chakan) तरुणाचा धडकेत मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.7) महाळुंगे खेड येथे चाकण तळेगाव रोडवर घडला आहे.

 याप्रकरणी संतोष विठ्ठल सांगळे (वय 32 चाकण ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचा मित्र दुचाकीवरून त्यांना घेण्यासाठी येत होता. यावेळी अज्ञात वाहनाने भरधाव वेगात येत त्यांच्या मित्राच्या गाडीला जोरात धडकला.  तेथे  आरोपी मदतीसाठी न थांबता वाहन घेऊन निघून गेला.

या अपघातात फिर्यादींचे मित्र गंभीर जखमी झाले व यातच त्यांचा मृत्यू झाला. यावरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस (Chakan) आरोपीचा शोध घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.