Chakan : चाकणमध्ये बालनाट्य शिबिर उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज : चाकण (Chakan) येथे बालनाट्य शिबिर उत्साहात पार पडले. कलाविष्कार मंच चाकण व बालरंगभूमी परिषद पुणे यांच्या माध्यमातून चाकण येथे स्व.आमदार सुरेशभाऊ गोरे विद्यालयात बालनाट्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर उत्साहात पार पडले यावेळी नाट्य क्षेत्रातील अनेक मंडळींनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.

यावेळी या चार दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये ज्येष्ठ रंगकर्मी, गिरीश भूतकर, हनुमंत कुबडे, प्रकाश खोत , शंकर घोरपडे, नारायण करपे प्रमोद पारधी नामदेव पडदूणे, विजय तांबे, संभाजी थिटे, मनोहर शेवकरी खेमचंद्र टिळेकर, जतीन पांडे, नरेंद्र लवाटे, नवनाथ लोंढे, माधव पाटील, अतुल सवाखंडे, मनोहर मोहरे यांनी नृत्य नाट्य संगीत योगा रंग म्हणजे खेळ गीत लेखन यांचे प्रात्यक्षिकाद्वारे धडे दिले.

Shree kshetr Aale : श्री क्षेत्र आळे मध्ये पुणे जिल्हा अंतर्गत 13 तालुक्यातील 13 आदर्श कीर्तनकारांस वारकरी कुलभूषण पुरस्कार

यावेळी कार्यक्रमाचे (Chakan) उद्घाटक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, विकास गोरे, बालरंगभूमीचे अध्यक्ष दिपाली शेळके, मुख्याध्यापिका प्रमिला गोरे माधुरी गोरे, डॉ. अविनाश अरगडे, श्याम राक्षे, विशाल बारवकर, रत्नेश् शेवकरी, मनीषा थिटे कुसुम कर्पे रंजना पारधी कोमल बारवकर अर्चना काळे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन कलाविष्कार मंच चाकणचे नारायण करपे यांनी केले तर आभार चंद्रकांत बुट्टे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.