Pimpri : सराईत गुन्हेगाराला कोयत्यासह अटक

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगाराला पिंपरी पोलिसांनी पिंपरी गाव येथून  (Pimpri) अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी मंगळवारी (दि.16) पिंपरीगाव येथील महाराष्ट्र शाळेच्या मागे केली.

पोलीस हवालदार  राजेंद्र भगवान बारशिंगे (वय 39 रा.) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून करण उर्फ कल्ल्या चरणसिंग टाक (वय 22 रा. मिलींदनगर, पिंपरी) असे अटक आरोपीचे नाव आहे.

Bhosari : सोन्याच्या बिस्कीटाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेचे दागिने केले लंपास

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा त्याच्या ताब्यात 200 रुपयांचा लोखंडी कोयता घेऊन दहशत पसरविण्याच्या हेतूने फिरत होता. यावेळी पोलीस त्याला ताब्यात घेत असताना त्याने पोलिसांना धक्काबुक्की करत अंगावर धावून येत तुम्ही गलती करताय, माझा टाईम आल्यावर (Pimpri) दाखवतो मी कोण आहे ते, अशी धमकी दिली.  पिंपरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.